Homeताज्या बातम्यापद्मश्री गणेश्वर शास्त्रींच्या हस्ते तुळजाभवानी मंदिरात वास्तूचालन विधी- शास्त्रीजींनीच काढला होता...

पद्मश्री गणेश्वर शास्त्रींच्या हस्ते तुळजाभवानी मंदिरात वास्तूचालन विधी- शास्त्रीजींनीच काढला होता अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त

धाराशिव रिपोर्टर

अयोध्देत रामलल्ला यांच्या प्राणप्रतिष्ठेचा शुभमुहूर्त ज्यांनी निश्चित केला होता,ते पद्मश्री गणेश्वर द्रवीडशास्त्री पंडित कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोध्दार निर्विघ्न पार पडावा यासाठी वास्तूचालन विधी करणार आहेत.उदया सकाळी 8 ते सायंकाळी 5 या कालावधीत मंदिरातील यज्ञमंडपाच्या पाठीमागे दुर्गा सप्तशती अनुष्ठानासह वरील विधी पद्मश्री शास्त्रीजी आणि ब्रम्हवृदांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. आचार्य शास्त्रीजी यांची ख्याती ऐकून हा विधी पूर्णत्वास नेण्यासाठी आपण त्यांना विनंती केली होती. त्यानुसार आदरणीय शास्त्रीजी तुळजाभवानी देवीच्या चरणी सेवा रुजू करण्यासाठी येत असल्याची माहिती मंदिर संस्थानचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

गतवर्षी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले पंडित गणेश्वर द्रवीडशास्त्री हे दक्षिण भारतातील सुपरिचित पंडित आहेत. गृह, नक्षत्र, योग आदी विषयातील त्यांचा अधिकार मोठा आहे. काशी येथील धर्मशाळेत त्यांच्याकडून धर्मशास्त्र, कर्मकांड आणि धर्मविधींचे शिक्षण घेण्यासाठी देश आणि देशाबाहेरून अनेक मान्यवर येतात. संपूर्ण जीवन ब्रम्हचारी असलेल्या गणेश्वर शास्त्री यांनी आयुष्यभर पादत्राण्यांचा त्याग केला आहे.अयोध्येतील राम मंदिरात रामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठा कोणत्या मुहूर्तावर करावी,याची वेळ गणेश्वर द्रवीडशास्त्री यांनीच निर्धारित केली होती. ज्योतिषशास्त्रातील त्यांचे योगदान अतुलनीय आहे. यासाठीच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. त्यापूर्वी त्यांना पद्मश्री पुरस्कार देवूनही भारत सरकारने सन्मानित केलेले आहे. काशी येथील विश्वनाथ मंदिराच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या भव्य धाम कॉरिडॉरचा लोकार्पण मुहूर्तही आचार्य द्रवीडशास्त्री यांनीच निर्धारित केला होता.

ऋषितुल्य असे आणि केवळ अंगावर एक धोती घालून साधे जीवन व्यतीत करणारे आचार्य शास्त्रीजी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने हाती घेण्यात आलेली मंदिर जीर्णोध्दार प्रक्रिया निर्विघ्न पार पडावी, यासाठी वास्तुचालन विधी करणार आहेत. तुळजाभवानी मंदिरातील यज्ञ मंडपाच्या पाठीमागे उदया सकाळी 8.30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत आचार्य शास्त्री आणि ब्रम्हवृंदांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गसप्तशती अनुष्ठान आणि वास्तुचालन विधी आयोजित करण्यात आला आहे. देशपातळीवर धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात मोठा अधिकार असल्याने आपण आचार्य शास्त्रीजींना स्वतः येऊन तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या कामाची पाहणी करण्याची विनंती केली होती.त्यानुसार त्यांनी पाहणी केली व हा विधी करण्याचे निश्चित केले आहे. या पवित्र कार्यात तुळजापूर आणि परिसरातील ब्रम्हवृंद आणि पुजारी बांधवही सहभागी होणार आहेत. जिल्हाधिकारी तसेच सर्व विश्वस्तही यावेळी उपस्थित असणार आहेत.आई तुळजाभवानी मातेचे महंत व तिन्ही पुजारी मंडळाच्या अध्यक्षांनाही उपस्थित राहण्याची विनंती आपण स्वतः केली आहे.कांही वयक्तिक अडचणीमुळे आपण स्वतः या ऐतिहासिक आणि पवित्र विधीस उपस्थित राहू शकत नसल्याची खंतही आमदार पाटील यांनी व्यक्त केली आहे.भाविकांनीही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन तुळजाभवानी मंदिर संस्थानच्यावतीने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!