आकर्षक कलाकृती साकारण्यासाठी देशातील कलाकार आणि मूर्तीकरांना अडीच ते तीन फूट मूर्ती बनवून सादर करण्याचे करण्यात येणार आवाहन
या भव्य शिल्पासाठी महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी लोकवाटा म्हणून मदत करण्याचे आ.राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
धाराशिव रिपोर्टर
श्री तुळजाभवानीचा 1865 कोटी रुपयांचा आराखडा नुकताच मंजूर झाला आहे. या प्रारूप विकास आराखड्यामध्ये मुख्य आकर्षण असलेले छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देतानाचे 108 फुटाचे शिल्प उभारण्याची प्रक्रिया आता सुरुवात झाली असल्याची माहिती मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी दिली आहे.
श्री.तुळजाभवानीच्या विकास आराखडयाला नुकतीच राज्यसरकारकडुन मंजुरी मिळाली आहे.लवकरच या विकास आराखडयाच्या कामाला सुरूवात होणार आहे.त्याची टेंडर प्रक्रीया सुरूवात झाली आहे.या आराखडयातील महत्वाचे आकर्षण असलेल्या छत्रपती शिवरायांना भवानी तलवार देतानाचे शिल्प उभारणीच्या प्रक्रीयेला आता सुरूवात झाली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांना तुळजाभवानीने भवानी तलवार दिल्याचे आपण ऐकत असलेली आख्यायिका या शिल्पामुळे चित्राच्या माध्यमातून प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्याच्या कलासंचनालयाच्या मार्गदर्शनाखाली या 108 फूट शिल्पाची उभारणी केली जाणार आहे. तुळजापूर शहराच्या बाहेरील बाजूस असलेल्या रामदरा तलावाच्या टेकडीवरती हे भव्य असे शिल्प उभारण्यात येणार आहे. यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांनी मदतीचा हात द्यावा असे आवाहन मंदिर संस्थांचे विश्वस्त तथा भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी केले आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात पहिल्या आठवड्यामध्ये देशातील कलाकारांनी मूर्तीकरांनी उदाहरण म्हणून अडीच ते तीन फूट उंचीचा या प्रतिकृतीचा पुतळा तयार करून कला संचनालयाला सादर करावा असेही आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी सांगितले आहे. अडीच ते तीन फूट उंचीचे शिल्प तयार करून कला संचानालयाला सादर करण्यासाठी 45 दिवसाचा अवधी मुर्तीकारांना देण्यात येणार आहे. या सादर केलेल्या पुतळ्याच्या पैकी पाच पुतळे मुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली निवडण्यात येणार आहेत.आणि नंतर आकर्षक डिजाईन निवडले जाणार आहे. तसेच हे मोठे शिल्प साकारत असताना या ऐतिहासीक आख्यायिकाप्रमाणे ज्या काळात हा प्रसंग घडलेला सांगितले जात आहे. त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची या प्रसंगावेळी वेशभूषा आणि त्यांचे वय कसे आणि किती होते याची माहिती इतिहास तज्ञाकडून घेतली जाणार आहे. या कामाच्या पुढील प्रक्रियेसाठी तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजारी यांनी कला संचनालयाला असे पत्रही पाठवले आहे. यानंतर आता या भव्य शिल्प उभारणीच्या प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याचं आमदार राहणार जगजीतसिंह पाटील यांनी सांगितले आहे.























