धाराशिवमध्ये ठाकरे शिवसेनेला धक्का : पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांचा भाजपमध्ये प्रवेश
चार दिवसांत ठाकरे गटाच्या अनेक कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश, जिल्हा परिषद निवडणुकीआधी राजकीय हालचालींना वेग
धाराशिव रिपोर्टर
धाराशिव जिल्ह्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला सोडून जानरांची संख्या वाढताना दिसत आहे.आज खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांचे विश्वासू धाराशिव पंचायत समितीचे माजी उपसभापती श्याम जाधव यांनी भजपचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यंच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे.या प्रवेशामुळे धाराशिव तालुक्यातील पंचायत समितीचे राजकीय समीकरण बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.विशेष म्हणजे, मागील चार दिवसांमध्ये धाराशिव तालुक्यातील ठाकरे शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.यामुळे ठाकरे गटाची संघटनात्मक ताकद कमी होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात असून,ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांना हा मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी आगामी निवडणुकांमध्ये भाजप मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे, ठाकरे शिवसेनेसमोर संघटना टिकवण्याचे मोठे आव्हान उभे राहिले असल्याचे चित्र आहे.धाराशिव जिल्ह्यात सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमुळे येत्या काळात आणखी किती जण पक्षांतर करणार,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
त्यांच्या या प्रवेशाबद्दल आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पक्षात मनःपूर्वक स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी सुरेशभाऊ देशमुख,नितीन काळे,नेताजी पाटील,नितीन भोसले,दत्ता देवळकर,राजाभाऊ पाटील,बालाजी गावडे यांच्यासह चिलवडी व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.























