जिल्हाप्रमुख मोहन पनुरे यांची हकालपट्टी करावी अन्यथा
तुळजापूर तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी राजीनामा देणार …..
धाराशिव रिपोर्टर
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मोहन पनुरे यांची पक्षाने तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिका—यांनी केली आहे.पनुरे हे निष्क्रीय जिल्हाध्यक्ष असुन त्यांनी आजपर्यंत पक्षवाढीसाठी कसलेही काम केले नाही.त्यामुळे त्यांना पदावरून हटवावे अन्यथा तुळजापूर तालुक्यातील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी राजीनामे देणार असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी दिली आहे. तसेच या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक मुंबई कडे रवाना झाले असल्याची माहिती मिळत आहे.
धाराशिव येथिल शिवसेनेचे निष्क्रीय जिल्हाप्रमुख मोहन पनुरेची पक्षाने तात्काळ उचलबांगडी करावी यासाठी लवकरच पक्षाचे पक्षप्रमुख तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,खासदार डाॅ.श्रीकांत शिंदे तसेच परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची तुळजापूर तालुक्यातील शिवसेना व युवासेनेचे सर्व पदाधिकारी भेट घेऊन आपापल्या पदांचा राजिनामा देणार आहेत.जिल्हाप्रमुख पनुरे हे पदावरती असल्यापासून तुळजापूर तालुक्यात जाणिवपुर्वक लक्ष दिलेले नाही.भाजपा आमदार राणापाटील यांच्यासोबत हातमीळवणी करून स्वहीत पाहत आलेले आहेत.तुळजापूर तालुक्यात शिवसेना वाढीसाठी कसलाच प्रयत्न केलेले नाही.पक्षसदस्य नोंदणीचा अर्ज कोणत्याच पदाधिका-यांना दिलेले नाही.पक्षाची एक ही बैठक घेतलेली नाही,अंदोलने नाहीत,शाखा काढलेली नाहीत आणि आता नुतन पक्षाचा तालुकाप्रमुख पदी नेमणुक करताना तालुक्यातील कोणत्याच पदाधिका-याला विश्वासात घेतले गेले नाही. आगामी नगरपालिका,जिल्हापरिषद व पंचायत समितीच्या निवडणूका लक्षात न घेता चुकीच्या निवडी केल्याने तुळजापूर तालुक्यातील पक्षाचे सर्व पदाधिकारी हे नाराज असून जिल्हाप्रमुखाची उचलबांगडी करावी तसेच तुळजापूर तालुक्यातीलच नुतन जिल्हाप्रमुख केला जावा अन्यथा जिल्हा सहसंपर्कप्रमुख अमरराजे कदम, उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके,तालुकाप्रमुख संभाजी पलंगे,उपतालुकाप्रमुख विपीन खोपडे,उपतालुकाप्रमुख लक्ष्मण माळी,उपतालुकाप्रमुख देविदास राठोड,युवासेना उपजिल्हाप्रमुख सुरज कोठावळे,नळदुर्ग शिवसेना शहरप्रमुख शिवाजी सुरवसे,युवासेना जिल्हा सचिव घोडके,विधानसभा अध्यक्ष खंडू कुंभार,तालुका संघटक गणेश रोकडे,निरंजन कारंडे,उपतालुकाप्रमुख अभिजित पाटिल,देवानंद चव्हाण,संजय गायकवाड,अनिल जाधव,कृष्णा घाटे,मल्हारी कांबळे,शाहुराज कोरेकर,उमेश कांबळे हे सर्वजण पक्षाकडे आपले राजीनामे देणार असल्याची माहिती सहसंपर्क प्रमुख अमरराजे कदम यांनी दिली आहे.























