वाहन चालकांकडून होतेय नियमांची पायमल्ली
धाराशिव रिपोर्टर
………..
लोकसंख्ये प्रमाणेच वाहतूकीची साधने वाढली आहेत.लहान थोरांच्या हातात चारचाकी आणि मोटारसायकल दिसत आहे.जिकडे तिकडे वाहतूक नियमांची पायमल्ली होत असल्याचे दिसत आहे.त्यामुळे लहान वयातच वहातुकीचे नियम अंगीकारण्यासाठी शालेय जीवनात पाठ्यपुस्तकात त्याचे धडे देणे आवश्यक असल्याचे आहे.
आलीकडच्या काळात वाहतुकीमध्ये कमालीचा बदल घडताना दिसत आहे.दळणवळणाची साधने वाढलेली आहेत.चौपदरी, सहापदरी अशा प्रकाराचे महामार्ग सध्या आपल्याला पहायला मिळत आहेत.परंतु,वाढत्या वाहतुकीची संख्या पाहता वाहन चालकांकडून नियमांचे पालन मात्र होताना दिसून येत नाही.त्यामुळे अपघातांचे प्रमाण ही वाढले आहे.
वाहतुकीचे नियम तसे मोठ्या प्रमाणात आहेत,सर्व नियम एकदाच लक्षात ठेवणे कठीण आहे. त्यामुळे शाळेच्या पाठ्यपुस्तकात प्रत्येक वर्षी एक धडा आणल्यास त्याचा फायदा येणाऱ्या नवीन पिढीला नक्कीच होईल. नियमांचे पालन होईल.वाहतुकीचे नियमांचे धडे जर शालेय पाठ्यपुस्तकात आणले तर येणाऱ्या नवीन पिढीकडून याचे पालन होईल.लहान वयातच मुलांना नियम माहिती मिळेल तसेच नियमांचे पालन झाल्यास आगामी काळात वाहतुकीची कोंडी तसेच अपघात कमी होतील.तरी राज्याच्या परिवहन विभागाने यात पुढाकार घ्यावा अशी मागणी होत आहे.
पाचवीपासून पाठ्यपुस्तकात धडे आणण्याची गरज
सध्यातरी आपल्या देशात पाचवी, सहावीची मुले-मुली सर्रास दुचाकीचा वापर करतात, जर इयत्ता पाचवीपासून बारावीपर्यंत प्रत्येक वर्षी एक धडा पाठ्यपुस्तकात आणला तर वाहतुकीचे नियम मुलांना लहानपणापासून माहीत होतील.























