धाराशिव येथे लाच लुचपत विभागाची मोठी कारवाई,दोन लाखांची लाच मागणी करून 95 हजार स्विकारताना पोलीस निरीक्षकासह महिला अंमलदार एसीबीच्या जाळयात
धाराशिव रिपोर्टर
दोन लाकाची लाच मागणी करत 95 हजार रुपये स्वीकारताना ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व महिला अंमलदार यांना एसीबीने रंगेहात पकडले 306 गुन्ह्यात आरोपीला मदत करण्यासाठी लाच मागणी करण्यात आली असल्याची प्राथमिक माहिती आहे.
धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मारुती शेळके व महिला अंमलदार लोखंडे या दोघांना 95 हजार लाच घेताना लाच लुचपत विभागाने ताब्यात घेतले.306 गुन्हयात आरोपीला मदत करतो असे सांगुन 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी पोलीस निरीक्षक मारूती शेळके यानी केली होती त्या नंतर तडजोडी अंति 95 हजार रुपये रक्कम घेण्याचे ठरले आणि ती रक्कम स्विकारताना
पोलीस निरीक्षक शेळके आणि लोखंडे या महिला अंमलदाराला पकडण्यात आले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे.























