येडशी येथील वारकरी शिक्षण संस्थेचे 37 व्या वर्षात पदार्पण. मोफत चालते कार्य .
सस्ते घराण्याचे संप्रदयात व कलाक्षेत्रात योगदान .
धाराशिव रिपोर्टर
धाराशिव जिल्हातिल येडशी येथील मृदंगाचार्य जालिंदर सस्ते हे 1987 पासुन वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातुन भजन,किर्तन, मृदंगवादन, पारंपारीक दिंडी पाऊले आदि परंपरा जतन ठेवत त्यांचे हे कार्य अखंडपणे सुरू ठेवुन आज या कार्यात 37 व्या वर्षात पाऊल ठेवत आहे.हजारो विद्यार्थी त्यांनी घडवून वारकरी संप्रदयाची पताका तेवत ठेवण्याचे कार्य आतिशय संघर्षमय काळातून त्यांनी ठेवल्याने वारकरी संप्रदयातुन व सामाजिक दृष्टीकोणातून त्यांचा विशेष प्रकारे नाम उल्लेख होत आहे .
हाच ठेवा त्यांचे चिरंजिव श्री महादेव जालिंदर सस्ते ( गुरुजी ) यांनी पुढे चालु ठेवला आसुन त्यांनी यात सुधारणा करून वारकरी शिक्षणा बरोबच संगीतकला ,संगणक , स्वावलंबन, शालेय शिक्षणास महत्व देत येडशी येथील वारकरी संप्रदयाचे वैभव म्हणून आसलेले श्रीसंत भगवानभऊ (आश्रम)मंदिर येथे आधुनिक पद्धतिने व मोफत हे शिक्षण देण्याचे कार्य सुरू ठेवले आहे.
या मंदिरा ठिकाणातुन सस्ते घराण्याची परमार्थीक वाटचाल सुरू झाली ते मंदिर गेली अनेक वर्षाच्या खंडा नंतर पुन्हा एकदा या मंदिर आश्रमातून मृदंग शिक्षणाचे धडे गिरवले जात आहे.श्रीसंत वै .रामकृष्ण भाऊ,भगवान भाऊ यांनी याठीकाणा वरून संपूर्ण महाराष्ट्रभर भागवत धर्माची पताका झळकवली.चंद्रा-सुर्या प्रमाणे असलेल्या या दोन्ही साधुंनि याठीकाणा वरून हजारो टाळकरी,मृदंगवादक,
कीर्तनकार,भजनी मंडळे बनवली व वारकरी संप्रदयाचा आचार विचार वादनकला युक्त परंपरा उभी केली.
थोडक्यात सांगायचे झाले तर वारकरी संप्रदयाचे मुल्य त्यांनी जोपासले व तसा शिष्य परिवार घडवला.यामुळे हे स्थळ संपूर्ण महाराष्ट्रातील वारकरी संप्रदयाचे श्रृद्धा-भक्तीस्थान आहे .परंतु याठीकाणी काहि तांत्रीक कारणाने टाळ ,मृदंग ,भजनाचा आवाज खंडीत झाला होता ते धार्मिक कार्य पुढे आनेक वर्ष पुन्हा तेवत ठेवण्यासाठी त्यांचे पट्य शिष्य मृदंगमहर्षि जालिंदर सखाराम सस्ते (बप्पा ) यांचे चिरंजीव महादेव सस्ते (गुरुजी ) हा ठेवा पुर्ववत जतन ठेवण्यासाठी समस्थ आश्रम संस्थान, ग्रामस्थ व भाविक यांनी त्यांच्याकडे बहाल केला आहे.आज सस्ते गुरुजी परिपुर्ण परिश्रम घेत याठीकाणी आज नित्य मृदंग,भजन, हारिपाठ आदिचे शिक्षण देऊन,नित्य पुजन व नेवेद्य प्रसादादिकाचा कार्यभाग त्यांनी त्यांच्या संकल्पनेतुन सुरू केला आहे.यासाठी त्यांना मंदिर संस्थान ग्रामस्थ नागरीक व मंदिराचे भाविक भक्त हातभार लावत आहेत .या कार्यमुळे समाजातुन व वारकरी संप्रदयातुन आनंद व्यक्त केले जात आहे .
संस्थेच्या वतीने 11 विद्यार्थी वर्गास मोफत शिक्षण –
आज हे कार्य श्रीसंत वै.रामकृष्ण भाऊ,भगवान भाऊ,
परमेश्वर महाराज मंदिर व मृदंगाचार्य जालिंदर ( बप्पा ) सस्ते वारकरी सेवा मंडळाच्या संयुक्त विद्यमाने 11 विद्यार्थी वर्गास मोफत प्रवेश देऊन त्यांना मृदंग ,भजन, हारिपाठ, दिंडी पावले ,वारकरी संप्रदयाचे धडे देऊन कलात्मक व संस्कारीत व स्वावलंबी युवक घडवण्याचे कार्य हाती घेतले आहे.विशेष म्हणजे त्यांच्या कडुन कोणत्याही प्रकारे फीस आकारली जात नाही.त्यांना जेवणाची व्यवस्था जागेवरच संस्थेच्या व्यवस्थानेच्या वतीणे करण्यात आली आहे .या शिक्षणासाठी एखाद्या विद्यार्थीवर्गास संस्थेत प्रवेश घ्यावायाचा आसल्यास त्यांना प्रवेश दिल्यापासून 30 दिवस सुसंस्कार , स्ववलंबन व शैक्षणीक दृष्ट्या ट्रेनिंग देण्यात येते यात पात्र झालेल्या विद्यार्थीना प्रवेश देण्यात येतो.संस्थेच्या व्यवस्थापन प्रक्रिये नंतर प्रवेश भरती पुर्ण झाल्यास एखादया शाळा बहिस्थ व परमार्थ आवडीच्या विद्यार्थी वर्गास परमार्थी करीअर म्हणून प्रवेश दिला जातो .
असे संस्थानचे धार्मिक कार्यक्रम व्यवस्थापक श्री महादेव सस्ते ( गुरुजी ) येडशीकर यांनी केले .
नित्य दैनिंदिनी .
विद्यार्थींना नित्य प्रसादिक भोजन, हरिपाठ,व भजन, प्रार्थना, पुजा ,शालेय आभ्यास ,सराव व पाठांन्तर,योग प्रणायाम,वाचन,लेखन,पारंपारिक वारकरी खेळीया गीतापाठ ,सुसंस्कार .स्वावलंबन आदिचे शैक्षणिक धडे आसा त्यांचा नित्य दिनक्रम चालतो .
आसा आहे दिनक्रम –
सकाळी 5 ते 6 शालेय आभ्यास ,व्यायम .6 ते 7 स्नान संध्या / स्वच्छता,7 ते 8 प्रार्थना ,योगप्रणायाम,वाचन,8 ते 9 वादन सराव व शिक्षण,9 ते 9,30 भोजन. नंतर शालेय शिक्षणासाठी शाळेत जाणे,4 :30 वाजता अल्पोपहार, 5 ते 6 वादन कलासराव शिक्षण, 6 ते 7:30 या हरीपाठ,भजन, 7:30 ते 8:30 शालेय आभ्यास, 8:30 ते 9 भोजन, 9 ते 10 शालेय आभ्यास,10 नंतर विश्रांती .























