Homeताज्या बातम्याधाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची...

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर ग्वाही बिहारमधील विजयाचे भाजपकडून जल्लोषात स्वागत 

धाराशिवला २४ तास मुबलक पाणीपुरवठा करणार
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जाहीर ग्वाही
  1. बिहारमधील विजयाचे भाजपकडून जल्लोषात स्वागत
धाराशिव रिपीर्टर
………………
तब्बल शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतरावरून आपण धाराशिव शहरासाठी पाणी आणले. अशक्यप्राय वाटणारी योजना आपण पूर्ण केली. मात्र उबाठा गटाला त्याचे साधे नियोजनही करता आले नाही. येत्या काळात धाराशिव शहराला २४ तास मुबलक पाणीपुरवठा केला जाणार आहे. त्यासाठी नियोजन सुरू आहे. हे केवळ स्वप्न नाही तर उजनी पाणीपुरवठा योजना ज्यापद्धतीने आपण यशस्वी करून दाखवली अगदी त्याप्रमाणेच ही कामसुद्धा आपण करणारच अशी जाहीर ग्वाही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.
बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएच्या ऐतिहासिक विजयाबद्दल भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुक्रवारी दुपारी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात विजयी जल्लोष साजरा केला. महापुरुषांना अभिवादन करून एकमेकांना मिठाई वाटून, फटाक्यांच्या आतषबाजीत आणि घोषणांच्या निनादात सर्वांनी हा आनंद साजरा केला. यावेळी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकारी बांधवांना आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मार्गदर्शन केले.
बिहारच्या जनतेने विकासाच्या मुद्द्यावर पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा विश्वास ठेवत एनडीएला अपेक्षेपेक्षा मोठे, अभूतपूर्व आणि ऐतिहासिक बहुमत दिले आहे. या विजयाने राष्ट्रीय पातळीवरील विकासमार्ग अधिक भक्कम झाला आहे. बिहार राज्यातील सर्वसामान्य सामान्य नागरिकांचा भारतीय जनता पक्षावर असलेला दृढ विश्वास या निकालातून ठळकपणे अधोरेखित झाला आहे. धाराशिवची जनतादेखील महायुती व भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. येत्या पालिका निवडणुकीत त्याचा प्रत्यय येणार आहेच. यापूर्वी धाराशिव शहरात आपण अनेक महत्वाचे प्रकल्प आणि योजना पूर्णत्वास नेल्या आहेत. आपल्याकडून सर्वसामान्य नागरिकांच्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्यासाठी अनेकजण त्यांच्या समस्या, अडीअडचणी आपल्याकडे घेऊन येतात. त्या सगळ्यांची पूर्तता करण्याची जबाबदारी आपली आहे. मात्र आपण सर्व पदाधिकारी बांधवांनी त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करायला हवा. शहरवासीयांच्या अडचणी दूर करणे आपले कर्तव्य आहे. मध्यंतरी पालिकेत सत्तेत असलेल्या ठाकरे गटाने शहराचे अक्षरशः वाटोळे केले आहे. त्या सगळ्या अडचणींवर मात करून आपण सर्वांनी कामाला लागावे असे आवाहनही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी केले.
बिहार विधानसभा निवडणुकीत अतोनात मेहनत घेणाऱ्या भारतीय जनता पक्ष व एनडीएच्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे व नेतेमंडळींचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच विकासाभिमुख सरकारला इतके भक्कम व ऐतिहासिक असे बहुमत देणाऱ्या बिहारच्या जनतेचे हार्दिक आभारही मानले. उपस्थितांनी एकमेकांना पेढे आणि लाडू भरवून हा आनंद साजरा केला. यावेळी  भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ  कुलकर्णी, सुरेश भाऊ देशमुख,. नितीन काळे,  नेताजी पाटील, .अनिल काळे, .अमित शिंदे, .नितीन भोसले, .सुनील काकडे, .अभय इंगळे,  युवराज नळे,  .नितीन शेरखाने,   संपतराव डोके,. पांडुरंग लाटे, प्रीतीताई कदम, अंजली बेताळे, विद्या माने,.  अभिजित काकडे, .रमण जाधव,.  मनोज रणखांब,.  विलास सांजेकर,   मेसा जानराव यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!