Homeताज्या बातम्याआदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही

आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही

शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक

आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही

धाराशिव रिपोर्टर

शबरी आवास योजनेअंतर्गत जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली महत्वपूर्ण बैठक मंगळवार, दि.13 जानेवारी रोजी पार पडली.या बठकीत आदिवासी पारधी समाजाच्या घरकुलांसाठी आवश्यक कागदपत्रे तात्काळ उपलब्ध करुन देण्याची जिल्हाधिकार्‍यांची ग्वाही जिल्हाधिकारी पुजार यांनी दिली.

जिल्हाधिकारी पुजार यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव शहरातील पापनास नगर येथे पारधी वस्तीस मूलभूत सोयीसुविधा व वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आयोजित मंगळवारी दुपारी बैठक घेण्यात आली. बैठकीस आदिवासी पारधी समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुनील काळे, उपविभागीय अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मैनाक घोष, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचे अक्षय बिरादार, आर. पी. कोलगणे, धाराशिवच्या तहसीलदार डॉ. मृणाल जाधव, परंड्याचे तहसीलदार निलेश काकडे, धराशिव नगर परिषदेच्या सीओ निता अंधारे, आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी धनंजय झाकर्डे,दत्ता बीरू काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहरी शबरी घरकुल योजनेंतर्गत माहिती देण्यात आली. धाराशिव शहरातील पारधी वस्ती, मधील 44 प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झालेले असून सदर 44 प्रस्तावांना लक्षांक नुसार 44 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आलेली आहे. मंजूर 44 लाभार्थ्यांचे 43 घरे पुर्ण करण्यात आलेली आहेत. उर्वरित 01 घरकुले प्रगतीपथावर आहेत.

सन 2024-25 करिता शबरी आदिवासी घरकुल (शहरी) योजनेंतर्गत धाराशिव शहरातील पारधी वस्तीमधील 345 प्रस्ताव प्राप्त झालेले असून सदर 345 प्रस्तावांना लक्षांक नुसार 345 लाभार्थ्यांना मंजूरी देण्यात आलेली आहे. मंजूर 345 घरकुलापैकी 244 घरकुल पुर्ण झालेली असुन 101 घरकुले प्रगतीपथावर आहेत.

त्याचबरोबर पापनाश नगर येथील पारधी वस्तीस मुलभुत सोयीसुविधा व वस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कामे प्रस्तावित करण्यात आली. यामध्ये नगरपालिकेेमार्फत 389 लाभार्थ्यांना 8-अ उपलब्ध करुन देणे, पारधी वस्तीस पाणीपुरवठ्याची सोय करुन देणे, वस्तीच्या परीसरामध्ये खुली व्यायामशाळा तयार करणे व इनडोअर जिम विकसित करणे, वस्तीच्या सर्व घरकुलांकरीता सौर उर्जेवरील सौर ऊर्जा पॅनेलची सुविधा देणे, वस्तीस पोहच रस्ता व अंतर्गत रस्त्यांचा विकास करणे, 389 कुटुंबांना घराच्या आतील व बाहेरील बाजुस प्लॅस्टर करणेसाठी प्रती घरकुल किमान 5 ब्रास वाळु उपलब्ध करुन देणे याबाबत चर्चा करण्यात आली. त्याचबरोबर भूम शहरातील आदिवासी पारधी समाज बांधवांसाठी जागा आणि बांधकाम साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

आदिवासी पारधी समाजातील डॉक्टर, वकिलांचा सत्कार

याच कार्यक्रमात आदिवासी पारधी समाजातून हलाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेऊन डॉ. झालेले दीपक नीळकंठ पवार आणि प्रख्यात वकील ॲड. शंकर धनाजी काळे यांचा जिल्हाधिकारी पुजार यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!