Homeताज्या बातम्याधाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत संभ्रम:शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत ठाकरे शिवसेनेबरोबर...

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत संभ्रम:शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत ठाकरे शिवसेनेबरोबर युती करणार का? महायुतीसोबत ठाम राहणार!

धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत संभ्रम:शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत ठाकरे शिवसेनेबरोबर युती करणार का? महायुतीसोबत ठाम राहणार!

धाराशिव रिपोर्टर

धाराशिव जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून,सत्ताधारी महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर येत आहेत.विशेषतः शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत यांनी भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे जिल्ह्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.एकीकडे पक्षश्रेष्ठी पातळीवर युती टिकवण्याचे प्रयत्न सुरू असताना,दुसरीकडे स्थानिक नेत्यांचे वक्तव्य आणि हालचाली वेगळीच कथा सांगत आहेत. त्यामुळे शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे जिल्हा परिषद निवडणुकीला ठाकरे शिवसेनेबरोबर युती करणार का? याबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

धाराशिव जिल्ह्यात महायुती एकसंघ असल्याचा दावा केला जात असला, तरी स्थानिक पातळीवरील सत्तासंघर्ष आणि नेतृत्वावरून सुरू असलेली चढाओढ आता जाहीरपणे दिसू लागली आहे.तानाजी सावंत यांनी भाजपाचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर केलेल्या टीकेमुळे भाजप-शिवसेना यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून,ऐन जिल्हा परिषद निवडणुकीच्या तोंडावर हा वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे—शिवसेनेचे आमदार तानाजी सावंत हे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत युती करणार का? की ते महायुतीतच ठामपणे राहून भाजपसोबत सक्षमपणे निवडणूक लढवणार? सध्या या प्रश्नाचे स्पष्ट उत्तर कुणाकडेही नसले, तरी सावंत यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद ही सत्ता आणि प्रभावाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. ग्रामीण भागातील राजकारण,विकास निधींचे नियोजन आणि आगामी विधानसभा राजकारणाची दिशा ठरवण्यात जिल्हा परिषद निवडणूक निर्णायक ठरते.त्यामुळेच प्रत्येक पक्ष आणि गट आपली ताकद पणाला लावताना दिसत आहे.
भाजप आणि शिवसेना यांच्यातील संभाव्य मतभेदांचा फायदा विरोधक घेण्याच्या तयारीत असून, महाविकास आघाडीही या परिस्थितीकडे संधी म्हणून पाहत आहे.जर महायुतीतील संभ्रम कायम राहिला,तर त्याचा थेट परिणाम निवडणूक निकालांवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
एकीकडे पक्षश्रेष्ठी पातळीवर युती टिकवण्याचे प्रयत्न सुरूअसताना,दुसरीकडे स्थानिक नेत्यांचे वक्तव्य आणि हालचाली वेगळीच कथा सांगत आहेत.त्यामुळे धाराशिव जिल्हा परिषद निवडणूक ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक न राहता, आगामी राजकीय समीकरणांची चाचणी ठरणार आहे, हे निश्चित.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील...

0
महायुतीकडून महेंद्र धुरगुडे यांना बेंबळी गटातून राष्ट्रवादीची उमेदवारी,उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दाखवला विश्वास धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून महत्त्वाच्या...

लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात

0
लोहाऱ्यात शिवसेनेचे शक्तिप्रदर्शन आनंद पाटील यांच्या मातोश्री सुवर्णा सतीश पाटील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मैदानात धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोहारा तालुक्यात शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली...

घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य...

0
घराणेशाहीला फाटा देत माजी मंत्री बसवराज पाटील यांचा मोठा निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी,सर्वत्र कौतुक धाराशिव रिपोर्टर जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी मंत्री आणि भाजपाचे...

मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट...

0
मतदारांना शंका असताना इव्हीएमचा हट्ट का? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा भाजपाला थेट सवाल धाराशिव रिपोर्टर देशासह महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाची मोठी घसरण झाल्याचे दिसत आहे. यामागे इव्हीएम...

धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री;...

0
धाराशिव जिल्ह्यात जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारांची गर्दी-आतापर्यंत 49 उमेदवारी अर्ज दाखल,586 अर्जांची विक्री; 8 प,स आणि जि,प ची निवडणुका एकत्रच धाराशिव रिपोर्टर धाराशिव जिल्ह्यात जिल्हा...

error: Content is protected !!