“दिल्लीमध्ये काय दिवे लावतो?” – भाजप आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरांवर टीका
दिल्लीतील कामगिरीवरूनच राजकीय आरोप-प्रत्यारोप, धाराशिवच्या राजकारणात नव्या वादाला तोंड
धाराशिव रिपोर्टर
धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली असून भाजपाचे आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर थेट टीका केलीय.“खासदार दिल्लीमध्ये नेमकं काय दिवे लावतो?” असा सवाल करत मल्हार पाटील यांनी ओमराजे निंबाळकर यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
दिल्लीमध्ये धाराशिव जिल्ह्यासाठी कोणते ठोस प्रश्न मांडले, विकासासाठी किती निधी आणला आणि जनतेच्या प्रश्नांसाठी किती वेळ आवाज उठवला, असा थेट सवाल करत त्यांनी खासदारांवर अप्रत्यक्षपणे निष्क्रियतेचा आरोप केला आहे.
या टीकेमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे.तुळजापूर नगराध्यक्ष विनोद पिटू गंगणे यांच्या पदग्रहण सोहळ्यातच राजकीय रणसंग्राम पाहायला मिळाला.”
“या सोहळ्यात मल्हार पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांची अक्षरशः लायकी काढत सडकून टीका केली.“इतकंच नव्हे तर मशाल चिन्हावरून उपरोधिक शब्दांत टीका करत विरोधकांची उघडपणे खिल्ली उडवण्यात आली.दरम्यान, या टीकेवर खासदार ओमराजे निंबाळकर काय प्रत्युत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. एकीकडे नगरपालिका निवडणुकीनंतरचा राजकीय हिशेब सुरू असतानाच, ही टीका आगामी स्थानिक राजकारणावर परिणाम करणारी ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.























